News
गुरु रविदास समता सामाजिक विचारमंच, मालेगाव.
गुरु रविदास जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१शुक्रवार रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग व पुस्तक वाटप हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी नम्र विनंती.. 🙏🏻🌹 🔹 कार्यक्रमाचे ठिकाण :- चंद्रमणी नगर,द्याने मालेगाव 🔹 वेळ :- सायंकाळी ७ वाजता
गुरु रविदास समता सामाजिक विचारमंच, मालेगाव.
गुरु रविदास जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी नम्र विनंती.. 🙏🏻🌹 🌹प्रमुख पाहुणे🌹 🔸इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (साहित्यिक व संस्थापक - अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद महाराष्ट्र - नांदेड) 🔸पुरुषोत्तम बोराळे (पत्रकार- बुलढाणा ) 🔸प्रा. डॉ. बालकवी लक्ष्मण सुरंजे (प्राध्यापक /साहित्यिक- मुंबई) 🔸इंजि. गणेश पवार (मालेगाव) 🔹 कार्यक्रमाचे ठिकाण :- हॉटेल मराठा दरबार, स्टेट बँक समोर,मालेगाव 🔹 वेळ :- सायंकाळी ६:०० वाजता
गुरू रविदास जयंतीनिमित्त कष्टकरी कामगार, विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव
गुरू रविदास जयंतीनिमित्त कष्टकरी कामगार, विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव गुरू रविदास समता सामाजिक विचारमंच मालेगाव तर्फे गुरू रविदास जयंती ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सप्ताह अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कागगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच गवंडी कामगार,गुणवंत विद्यार्थी व कोरोना योद्धा यांचा सत्कार व गौरव हॉटेल मराठा दरबार येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदू डावरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत देगलूरकर, पत्रकार पुरुषोत्तम बोराडे, प्रा.डॉ. बालकवी सुरंजे, इंजी. गणेश पवार, व माजी खान्देश झोन प्रभारी (बसपा) देविदास सुरंजे हे उपस्थित होते. महामानवांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाची प्रस्तावना रोहित तेली यांनी केली. प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते मांडली. साहित्यिक देगलूरकर यांनी गुरू रविदासांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकला. देगलूरकर यांनी गुरु रविदास यांचा दोहा 'ऐसा चाहु राज मै जहा मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसै रविदास रहे प्रसन्न' सांगितला. या दोह्याद्वारे गुरू रविदास यांना समानतेचे राज्य अभिप्रेत होते असे प्रतिपादन केले. सत्कारार्थी पुढील प्रमाणे ज्ञानेश्वर मेहंदळे,सुभाष राजवंशी, सुरेश आहिरे, छगन आहिरे,किशोर शिलवान,भारत सुरंजे,शरद पाथरे(कोरोना योद्धा),विकास कासवे(कोरोना योद्धा),पंचशिला पाथरे(ENTC भारतातून प्रथम क्रमांक),शेखर ठाकरे,ऍड.वैदेही भगीरथ,ऍड.मनोज आहिरे,डॉ.प्रशांत काथेपुरी, दत्तात्रेय काथेपुरी,सुजित बटाव,जयेश ठाकरे, अशोक आहिरे,योगेश बागुल, प्रदिप आहिरे,अनिकेत सुरंजे,स्नेहा सुरंजे तसेच यावेळी प्रा.डॉ. बालकवी सुरंजे यांना 'गुरू रविदास समता मूलक जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल तेली,राजेश राजवंशी,किरण राजवंशी,दिलीप पाथरे,पंकज पवार व रोहित तेली यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र आहिरे यांनी केले.
सदिच्छा भेट
मालेगांव शहरातील प्रतिष्ठित समाजबांधव व निवृत्त अभियंता मा.आण्णासाहेब पवार यांची 'गुरू रविदास समता,सामाजिक विचारमंच मालेगांव तर्फे नोकरीतून निवृत्त झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेण्यात आली. निवृत्तीनंतर समाजकार्यात पूर्णवेळ देण्याचा संकल्प यावेळी मा. आण्णासाहेब पवार साहेब यांनी केला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव कु.धिरज पवार हेही उपस्थित होते. 'गुरू रविदास समता,सामाजिक विचारमंच तर्फे त्यांना आनंदी व निरामय जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
vsdv
sdvsdv
About Charmakarmangalashtak
आमच्या सर्वे सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना आणि अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा, याच हेतूने आम्ही फक्त रोहिदास चांभार भाषिक समुदायासाठी सेवा पुरवितो, आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत होतो.
SIGN IN YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?
FORGOT YOUR DETAILS?
Go up